नुकतेच मुंबईतील श्रीलंकेविरोधातील पहिल्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला
श्रीलंकेविरोधातील या सामन्यानंतर चर्चा होतेय ती भारताची तोफ, जम्मू एक्सप्रेस उमरान मलिक याचीच..
उमरान मलिकने या सामन्यात चक्क ताशी 155 किमी वेगाने चेंडू टाकत विकेट घेतली अन् त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.
या संपूर्ण सामन्यात उमरानने तुफान वेगाने गोलंदाजी केल्याचे दिसून आले, त्याने सातत्याने ताशी 145 किमी पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकले.
सामन्यातील 17व्या षटकातील चौथा चेंडू उमरानने तब्बल ताशी 155 किमी वेगाने टाकला, ज्यावर त्याला विकेटही मिळाला.
उमरानचा तो चेंडू या सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू ठरला.
तसेच या चेंडूसोबत उमरान आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाजही ठरला.
नोव्हेंबर 2022 मध्ये वनडे पदार्पण करतानाही सातत्याने ताशी 145-150 किमी वेगाने गोलंदाजी केली होती.
आजवर खेळलेल्या प्रत्येक सामन्यात उमरानच्या वेगाने प्रभावित केलं आहे, गेल्या महिन्यात झालेल्या बांगलादेश दौऱ्यातही तो चर्चेचा विषय होता.