सेक्सदरम्यान मृत्यू झाल्याची एक घटना अलीकडे घडली होती. त्यानंतर जोडप्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं.
एखादा आजार उद्भवल्यानंतर सेक्स करावा की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसलाय.
सेक्स ही व्यायामाप्रमाणेच एक फिजीकल अॅक्टिव्हिटी आहे. व्यायामाप्रमाणेच सेक्स करताना भरपूर एनर्जी लागते.
मात्र हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णाची कॅपॅसिटी कमी झाली असल्याने त्याला कुठल्याही फिजीकल अॅक्टिव्हीटीने लवकर थकवा जाणवतो. म्हणूनच डॉक्टर अशांना काही सल्ले देतात.
सेक्स ही एक अशी शारीरिक क्रिया आहे. ज्यामध्ये स्नायू आणि हृदय यांचा समतोल असणं गरजेचं असतं.
जर तुम्ही हृदयरोगी असाल तर तुमच्यासाठी सेक्स न करणं हा एक उत्तम ऑप्शन आहे. किंवा करायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तज्ज्ञांच्या मते, हार्ट सर्जरी झाल्यानंतर जवळपास सहा महिने एखाद्या व्यक्तीची शारीरिक संबंध ठेवू नये.