UPSC,MPSC परीक्षा घरबसल्या करा Crack स्टेप बाय स्टेप असा करा अभ्यास

| Sakal

सर्वप्रथम MPSC परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे अभ्यासाचा आराखडा तयार करण्यात मदत होते.

| Sakal

तुम्हाला MPSC कन्या ऑफिशिअल साईटवरून परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करावा लागेल. सिलॅबस मिळाल्यानंतर अभ्यासाची तुमची एक चेकलिस्ट तयार करा. या चेकलिस्टनुसार अभ्यास करत राहा.

| Sakal

MPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्यके उमेदवाराने मागच्या काही वर्षांचे पेपर सोडवून बघणं खूप महत्त्वाचं आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कोणत्या विषयांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

| Sakal

पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी किमान 10 वर्षांचे पेपर सोडवा. हे आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करेल.

| Sakal

अनेकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल की नाही हे तुमच्यातील आत्मविश्वासावर अवलंबून असते.

| Sakal

अभ्यास करताना किंवा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा.

| Sakal

फक्त MPSC च नाही तर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चालू घडामोडींची माहिती ठेवा.

| Sakal

MPSC परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने दररोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी तसंच ऑनलाईन करंट अफेअर्सच्या काही टेस्टही द्याव्यात.

| Sakal