उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.
कधी ती सॉफ्ट टॉईज असलेले आउटफिट घातलेली दिसते तर कधी सेफ्टी पिनने बनवलेल्या ड्रेसमध्ये ती दिसते.
उर्फी ही बिधास्त मुलगी असून लोक तिच्याबद्दल काय विचार करते याची तिला अजिबात पर्वा नाही.
तिच्या प्रत्येक लूकवर लोक त्याला सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल करतात. दरम्यान उर्फी आता नवीन रुपात दिसली.
उर्फी पुन्हा एकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत आली आहे. गुरुवारी ती निळ्या रंगाच्या ओव्हरऑल गाऊनमध्ये दिसली.
तिने निळा मास्क देखील घातला होता, जो तिच्या ड्रेसचा एक भाग होता.
या पोशाखात फक्त तिचे डोळे आणि ओठ दिसत होते.
हा ड्रेस परिधान करून ती कारमधून खाली उतरताना दिसली. यानंतर तिने मीडियाला पोजही दिली. सध्या तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरलही होत आहे.