प्रेग्नेंसीत चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या

| Sakal

गरोदरपणात हिरव्या पालेभाज्यांचं अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

| Sakal

परंतु गरोदर महिलांनी कोबीचं अतिसेवन करू नये. कारण कोबीमध्ये कीटकनाशके आणि बुरशी असू शकते. अशा भाज्या खाल्ल्यानं आपल्याला एलर्जी होऊ शकते किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.

| Sakal

गर्भावस्थेत वांगी जितकी कमी खाल तितकं आरोग्यासाठी चांगलं आहे. ज्या मातीत वांगीची लागवड केली जाते, त्यात टॉक्सोप्लाझ्मोसिस (Toxoplasmosis) नावाचा घटक आढळतो. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.

| Sakal

जास्त प्रमाणात वांगी खाल्ल्यास एलर्जीची समस्या उद्भवू शकते. इतकंच नाही तर गरोदरपणात पचनक्रिया मंदावलेली असते. वांगी खाल्यानं बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

| Sakal

गर्भावस्थेत उष्ण पदार्थांचं सेवन टाळावं, असं आपल्याला डॉक्टर सल्ला देतात.

| Sakal

आलं (Ginger) देखील उष्ण पदार्थ आहे. गरोदरपणात महिलांनी आल्याची पदार्थ खाणं टाळायला हवं. गर्भधारणेच्या सुरूवातीच्या तीन महिन्यांत गर्भपात होण्याची समस्या उद्भवू शकतात.

| Sakal

गरोदरपणात कारले (bitter gourd) अतिप्रमाणात सेवन करू नये. त्यामुळे पोटदुखी, अपचन आणि अतिसारसारख्या समस्या उद्भवू शकतात.

| Sakal

गरोदरपणात गाजर जास्त प्रमाणात खाल्ल्यानं त्वचा पिवळसर होऊ शकते. गाजरमध्ये कॅरोटीन नावाचा घटक असतो.

| Sakal

गाजर जास्त सेवन केल्यास आपल्याला कॅरोटिनीमिया होण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन एचे प्रमाण गर्भवाढीस अडथळा आणू शकते.

| Sakal