Vice President: जाणून घ्या,आत्तापर्यंतचे सर्व उपराष्ट्रपती

| Sakal

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची बिनविरोध निवड झाली.

| Sakal

झाकीर हुसेन - 1962 मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान झाले. याआधी सलग दोन वेळा उपराष्ट्रपती राहिलेले डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची बिनविरोध निवड झाली होती.

| Sakal

व्ही.व्ही.गिरी - 6 मे 1967 रोजी तिसऱ्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. व्ही.व्ही गिरी 71.45% मते मिळवून देशाचे तिसरे उपराष्ट्रपती बनले.

| Sakal

गोपाळ स्वरूप पाठक - व्ही.व्ही.गिरी यांनी 1969 मध्ये उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गोपाळ स्वरूप पाठक 6 उमेदवारांमधून निवडून आले.

| Sakal

बीडी जट्टी - 27 ऑगस्ट 1974 रोजी देशाच्या पाचव्या उपराष्ट्रपतीपदाची धुरा बीडी जट्टी यांनी सांभाळली.

| Sakal

मोहम्मद हिदायतुल्ला - 1979 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोहम्मद हिदायतुल्ला यांची बिनविरोध निवड झाली.

| Sakal

आर वेंकटरामन - वेंकटरामन यांना 1984 च्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली होती.

| Sakal

डॉ.शंकर दयाळ शर्मा - 1987 साली देशाच्या उपराष्ट्रपतीपदी डॉ.शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध निवड झाली.

| Sakal

के आर नारायणन - केआर नारायणन यांनी 1992 मध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती. नारायणन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काका जोगिंदर सिंग यांचा विक्रमी मतांनी पराभव केला.

| Sakal

कृष्णकांत - 1997 मध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाबचे कृष्णकांत उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले.

| Sakal

भैरव सिंह शेखावत - 2002 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजपचे उमेदवार भैरव सिंह शेखावत विजयी झाले.

| Sakal

मोहम्मद हमीद अन्सारी - भैरव सिंह शेखावत यांच्यानंतर, मोहम्मद हमीद अन्सारी हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडून सलग दोन वेळा उपाध्यक्षपदी निवडून आले.

| Sakal

व्यंकय्या नायडू - सध्या देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आहेत. नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेले भैरव सिंह शेखावत यांच्यानंतरचे दुसरे उपराष्ट्रपती आहेत.

| Sakal