लक्ष्मणसह 'या' दिग्गजांच्या नशिबात एकही World Cup सामना नव्हता

| Sakal

देशाकडून खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे वर्ल्डकप खेळणे हे स्वप्न असते.

| Sakal

मात्र भारताच्या काही दिग्गज खेळाडूंचे हे स्वप्न अधुरेच राहिले. काहींनी संघात संधीच मिळाली नाही तर काही जण सामना खेळण्यापासून वंचित राहिले.

| Sakal

Ishant Sharma : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला वनडे वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली नाही. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची त्याची संधी दुखापतीमुळे हुकली.

| Sakal

Irfan Pathan : इरफान पठाण जरी 2007 च्या वनडे वर्ल्डकप संघात निवडला गेला असला तरी त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याने 2007 चा टी 20 वर्ल्डकप गाजवला.

| Sakal

Ambati Rayudu : अंबाती रायुडू देखील 2019 चा वर्ल्डकप खेळता खेळता राहिला. तो त्या काळातला भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी एक चांगला पर्याय होता. मात्र आयत्यावेळी विजय शंकरने संघात स्थान पटकावले.

| Sakal

Parthiv Patel : पार्थिव पटेलने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला 2003 च्या वर्ल्डकप संघात स्थान देखील मिळाले मात्र राहुल द्रविडने विकेटकिपिंग केल्याने त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर धोनी युग सुरू झालं

| Sakal

VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण एकही वनडे वर्ल्डकप सामना न खेळणे हे आश्चर्यकारक आहे. मात्र भारतीय संघाने अंतिम फेरी गाठलेल्या 2003 च्या वर्ल्डकपमध्ये तो खेळेल असे वाटत होते. मात्र दिनेश मोंगियाने बाजी मारत संघात स्थान पटकावले.

| Sakal