दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ हा फार तणावाचा असतो. तेव्हा त्यांच्या आहारात अक्रोडचा समावेश नक्की करा.
एका स्टडीमध्ये मानसिक आणि सामान्यत: अक्रोड खाण्याचे सकारात्मक फायदे सांगण्यात आलेय.
ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये यावर अभ्यास करण्यात आला. न्यूट्रिएंट्स जनरल मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आलाय.
विशेषत: मुलींमध्ये असणारा अभ्यासाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी अक्रोड फायदेशीर ठरते.
अक्रोडमध्ये हाय डीएचए असते. जे एकप्रकारे ओमेगा -३ फॅटी असिड असतं.
डीएचए ब्रेन हेल्थ, कॉग्निटीव्ह परफॉर्मंसमध्ये सुधारणा आणि ब्रेन सेलला वाढवण्यास फायदेशीर ठरते.
फक्त एक चतुर्थांश कप अक्रोड दिवसातून खाल्ल्यास १०० टक्के डीएचएची गरज पूर्ण होते.
अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, सेलेनियम इत्यादी गोष्टी असतात. जे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी फार चांगले असतात.
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे मुलांची इम्युनिटी पॉवरसुद्धा चांगली राहाते.