मुलगा-मुलगीचं लग्न जुळवताना बरेच पालक पत्रिका बघण्यावर भर देताना आजही दिसतात.
पण काही लोक पत्रिका बघणे महत्वाचे नाही असेही समजतात.
जन्म पत्रिकेपेक्षा मुला मुलीचं मन जुळणं आवश्यक आहे असाही मुद्दा काही जण मांडतात.
पण अरेंज मॅरेज करताना बहुतेक जण आजही पत्रिका बघून, गुण जुळतात की, नाही याचा विचार करताना दिसतात.
पत्रिका जुळूनही घटस्फोट झालेली उदाहरणेही आहेतच असा तर्कही काही लोक लावतात.
पण ज्योतिष तज्ज्ञ यावर सांगतात की, फक्त गुण बघून भागत नाही, इतर काही दोष आहेत का हे देखील तपासायला हवं.
जन्म पत्रिका म्हणजे कुंडली बघून लग्न करताना ३६ पैकी किमान १८ गुण तरी जुळणे आवश्यक समजले जाते.
एकूणच पत्रिका जुळो अगर नाही मन, मत, विचार जुळणे आवश्यक असतात हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा.