आपल्या रोजच्या जेवणातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा.
कांदा प्रत्येक घरामध्ये हमखास असतोच.
या कांद्याचे अनेक उपयोग आहेत, काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या...
कांद्यामुळे पचन मजबूत होतं. कच्चा कांदा पचनासाठी चांगला असतो.
कच्चा कांदा शरीरातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
कच्च्या कांद्याच्या सेवनाने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
कांद्यात व्हिटमिन सी भरपूर आहे, त्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असते यामुळे संसर्गजन्य रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.
कांदा हाडांसाठीही चांगला आहे, कांद्याच्या सेवनाने हाडेही मजबूत होतात.