Amritpal Singh : पंजाब पोलिसांनी अटक केलेला अमृतपाल सिंह कोण?

सकाळ डिजिटल टीम

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला त्याच्या चिथावणीखोर भाषणामुळे त्याला केंद्रीय तपास संस्थांकडून अटक करण्यात आली आहे.

Amritpal singh Khalsa

अमृतपाल सिंग खालसा दुबईमध्ये ट्रान्सपोर्टचं काम करत होता. शेतकरी आंदोलनादरम्यान तो भारतात आला होता.

Amritpal singh Khalsa

त्यानंतर नंतर पंजाब आवडू लागले अन् तो धार्मिक बनला. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याच्या चिथावणीखोर भाषणांचे संकलन केले आहे.

Amritpal singh Khalsa

त्याने आपल्या भाषणातून वेगळा खलिस्तान पाहिजे अशी मागणी केली आहे. मागच्या ४ ते ५ महिन्यात त्याला चांगली लोकप्रियता मिळाली आहे.

Amritpal singh Khalsa

तो सध्या धार्मिक लीडरच्या रूपात उदयास आला असून गावागावांत त्याची पकड वाढताना दिसत होती.

Amritpal singh Khalsa

केंद्र सरकारने कृषी कायदे परत घेतल्यानंतर अमृतपालसिंग परत दुबईत गेला होता, त्यानंतर तो ऑगस्ट २०२२ मध्ये परत पंजाबमध्ये आला

Amritpal singh Khalsa

दीप सिद्धू याने स्थापन केलेल्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेचं काम दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपालसिंह खालसा पाहू लागला. त्यानंतर दीप सिद्धूच्या भावाने अमृतपाल खालसा याची 'वारिस पंजाब दे' ही संघटना दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे'पेक्षा वेगळी असल्याचं त्याने सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amritpal singh Khalsa