रोहित कणसे
अभिनेत्री जिया खान सुसाइड केस मध्ये आज कोर्टाकडून निकाल सुनावला जाणार आहेत.
या प्रकरणी जियाच्या आईने सुरज पांचोलीवर मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.
सूरज पांचोली आज बॉलिवूड अभिनेता असून तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा आहे.
सूरजने 2015 मध्ये आलेल्या 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी दिसली होती
सूरज सध्या जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आहे.
आज सीबीआय कोर्टात जिया खान मृत्यू प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावण्यात येणार आहे.
सूरजचं बॉलिवुड करियर काही खास राहिलं नाहीये पण अभिनेत्री जिया खान मुळे तो चर्चेत आला, सांगितलं जातं की दोघे एकमेकांना डेट करत होते.
जिया खान २०१३ मध्ये तिच्या घरात मृत आढळली होती, यानंतर तिच्या आईने यासाठी सूरज जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणी सूरज पंचोली ने स्वतः निर्दोष असल्याचं सांगितलं होतं, दरम्यान आज कोर्ट या प्रकणाचा निकाल देणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.