प्रत्येकाला पत्त्यांचा डाव खेळायला आडवतो.
या डावात हुकमी एक्का महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.
पत्त्याच्या कॅटमधे सर्वाचे लक्ष वेधतो तो इस्पीक एक्का
पूर्वीच्या काळी म्हणजे १८ व्या शतकात हा खेळ युरोपात खूपच प्रसिद्ध होता.
या खेळाच्या प्रसिद्धीमुळे यावर कर लावण्यात आला होता.
१५८८ साली क्वीन ॲनने याप्रकारचा कर पहिल्यांदा लागू केला.
१८२८ पर्यंत पत्त्याच्या कॅटवर कर चुकता केल्याचे समजण्यासाठी एका पानावर स्टँप चिकटवला जाई.
हे पान सर्वात वरच्या बाजूला ठेवले जाई.
नव्या कोऱ्या सेटमध्ये नेहमीच पहिले पान हे इस्पिक एक्क्याचे असते.
१८२८ नंतर कराचा स्टँप हाताने न चिकटवता तो सरळ इस्पिक एक्क्याच्या पानावरच छापला जाई.