पहिल्या वर्षाला घाबरुनच लोक म्हणतात, 'लग्न नको गं बाई!'

| Sakal

लग्नानंतरचं पहिलं वर्ष नवरा आणि नवरी दोघांसाठीही खूप अवघड जातं. कशामुळे? जाणून घ्या..

| Sakal

नव्या जबाबदाऱ्या - घरची, जोडीदाराची आणि घरातल्या इतरांची जबाबदारी आल्याने रुळायला थोडा वेळ लागतो.

| Sakal

नवं घर - वर्षानुवर्षे ज्या घरात राहिलो, ते सोडून नव्या ठिकाणी राहायला जाणं मुलींना अवघड जातं. तर नवी व्यक्ती आपल्यासोबत आपल्या घरात राहणार यामुळे मुलांनाही जरा अवघडल्यासारखं वाटतं.

| Sakal

नवे लोक आणि त्यांच्या सवयी - घरातल्या नव्या लोकांच्या सवयी, स्वभाव जाणून घेण्यात वेळ जातो.

| Sakal

अपेक्षांचं ओझं - दोन्ही कुटुंबाच्या नवरा नवरीकडून जबाबदाऱ्या स्विकारण्याची, मनं सांभाळण्याची अपेक्षा असते. याचं कधी कधी ओझं होतं.

| Sakal

एकमेकांना वेळ देणं जमत नाही - लग्नानंतर जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे दोघांना एकमेकांना वेळ देणं जमत नाही, त्यामुळे चिडचिड होते.

| Sakal

एकमेकांचे निगेटिव्ह मुद्दे - एकमेकांसोबत काही काळ घालवल्यानंतर फक्त स्वभावातले चांगले गुणच नव्हे तर वाईट गुणही दिसू लागतात. त्यामुळे थोडी नाराजी होती.

| Sakal

एकमेकांशी न पटणं - नव्या स्वभावांसोबत जुळवून घेताना थोडे खटके उडतात.

| Sakal

एकटेपणा - सुरुवातीला दोघंही अवघडलेले असतात. एकमेकांसोबत हवं तेवढं रोमँटिक होणं अवघड असतं. त्यातूनच एकटेपणा येऊ शकतो.

| Sakal