Kangana Ranaut : कंगना वारंवार ट्रोल का होते?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही जितकी तिच्या चित्रपटांसाठी चर्चेत असते तितकीच ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठीही चर्चेत असते.

Kangana Ranaut | sakal

कंगना ट्विटरवर परतली आहे. काही महिन्यापूर्वी ट्विटरकडून कंगनाचं ट्विटर हँडल स्थगित करण्यात आलं होतं.

Kangana Ranaut | sakal

ट्विटरवर परतल्यावर कंगनाने पुन्हा बॉलिवूडवर निशाणा साधत चित्रपटाचे यश हे नेहमीच आकड्यांच्या आधारावर मोजले जातं , गुणवत्तेवर नाही अशी खंत व्यक्त केली.

Kangana Ranaut | sakal

अनेकदा ती सडतोड भाष्य करण्याच्या सवयीने ट्रोलही झाली आहे.

Kangana Ranaut | sakal

कंगनाचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबतचा वादही बराच गाजला होता.

Kangana Ranaut | sakal

याशिवाय कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. यामुळेही ती चांगलीच ट्रोल झाली होती.

Kangana Ranaut | sakal

सोबतच कृषि कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगनाने दहशतवादी संबोधलं होतं.

Kangana Ranaut | sakal

कधी करण जोहर तर कधी बॉलीवूडमधील नेपोटिझमवर तर कधी महाराष्ट्र किंवा दिल्ली सरकारवर टिका करत असल्यामुळे कंगना कायमच चर्चेत राहली.

Kangana Ranaut | sakal

आता कंगना पुन्हा ट्वीटरवर परत आल्याने तिच्या ट्वीट्सकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Kangana Ranaut | sakal

गेल्या वर्षीपासून कंगना 'इमर्जन्सी' या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut | sakal