लग्न म्हणजे नवरा-नवरीच्या आयुष्यातला महत्त्वाचा सोहळा असतो.
लग्नाआधीचा सोहळा म्हणजे साखरपुडा.
साखरपुड्यात नवरा-नवरी पुष्पगुच्छ एकमेकांना देतात आणि अंगठ्याही घालतात.
अंगठी नेहमी अनामिकेत म्हणजे मधल्या बोटाच्या शेजारील बोटात घातली जाते.
असं का? त्याच बोटात का? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच.
त्याचं कारण म्हणजे शास्त्रानुसार, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते.
म्हणजे ही बोटाची रक्तवाहिनी थेट हृदयाशी जोडलेली आहे, असं मानलं जातं.
तसंच अनामिका हे जन्मोजन्मी एकत्र असण्याचं प्रतिक मानलं जातं. म्हणून साखरपुड्याची अंगठी याच बोटात घातली जाते.