महाराष्ट्रात वडापावचे असंख्य चाहते आहे.
वडापावला तर मुंबईची जान समजल्या जाते.
धावपळीच्या आयुष्यात कित्येकांना चालता बोलता वडापाव कित्येकांची भूक भागवतो.
वडापावचे तसे तर भरपूर प्रकार आहे.
१९६६ मध्ये अशोक वैद्य या व्यक्तीने दादर च्या रेल्वे स्टेशन वर वडापाव विकण्याला सुरुवात केली होती.
आणि त्यांनीच सर्वात आधी वडापावचा स्टॉल लावला होता.
तेव्हापासून वडापाव नावारुपास आला.
वडापाव हा मुंबईची ओळख आहे, मुंबईची शान आहे. पण आता वडापाव फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिलेला नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासोबतच भारताच्या इतर भागांमध्ये मिळू लागला आहे
वडापाव झटपट प्रकार आहे, दोन मिनिटात खाऊन हात रूमालाला पुसून आपल्या कामाला लागू शकता.
मुंबई सारख्या पळणाऱ्या शहराला घाई गडबडीतही तृप्त करणारा वडापाव आता सर्वांनाच हवाहवासा वाटतो.
वडापावसोबत आंबट तिखट गोड चटणी हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.