शुभप्रसंगी कलश, विवाह, पूजा,उत्सवाप्रसंगी स्थापन करून संस्कृतीचे, सुख-समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.
बहुतेक घराघरांमध्ये कलश हा नित्यनेमाने पूजला जातो.
कलश म्हणजे पंचतत्वापासून तयार झालेला एक घट आहे आणि मानवी शरीरही पंचतत्वांनी बनलेले आहे.
कलश माती, सोने, चांदी,तांबे या पैकी कोणताही असो त्याचे महत्त्व तेवढेच असते कारण देवांनी अमृत भरण्यासाठी तयार केलेले आहे.
कलशावर असलेली पाने कलशा वर आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतात या पानांचेही धार्मिक दृष्टीने फार महत्त्व असतं.
ही हिरवी पाने निसर्गाचे,चैतन्याचे,सुबत्तेचे प्रतिक आहे.कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वताचे प्रतिक आहे.
पृथ्वी, आप, तेज , वायू आणि आकाश ही पाचही तत्व नारळात आहेत म्हणून त्याला श्रीफळ म्हटले जाते.