...म्हणून युजर्स महागातला महाग iPhone खरेदी करतात

| Sakal

Apple चा iPhone भारतात तसेच जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यांची किंमत कितीही जास्त असली तरी तो खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. मग त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले तरीही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की iPhones इतके महाग असूनही तो घेण्याकडे युजर्सचा कल का आहे.

| Sakal

हॅकर्स या फोन्सला सहजासहजी हॅग करू शकत नाही. त्यामुळे जगभरातील आघाडीच्या नेत्यांपासून ते चित्रपट कलाकारांपर्यंत सर्वजण सुरक्षिततेच्या दृष्टीने आयफोन वापरतात.

| Sakal

आयफोनचा कॅमेरा सुपर डुपर आहे. याच्या मदतीने तुम्ही सर्वोत्तम व्हिडिओ आणि फोटो क्लिक करू शकता. यूट्यूबर्स देखील त्यांच्या व्हिडिओंसाठी आयफोन वापरून YouTube वर व्हिडिओ टाकतात.

| Sakal

अनेक फोन प्रोसेसरमुळे कालांतराने स्लो होतात. मात्र, प्रोसेसर स्लो होऊन फोन हँग होणे अशा प्रकारच्या समस्या आयफोनमध्ये येत नाहीत. त्यामुळे फोन हँग होण्याच्या त्रासापासून युजर्सची सुटका होते.

| Sakal

डिझाइन आणि लूकबाबत आयफोनचे डिझाइन ट्रेंडिंगमध्ये आहे. नवीन आयफोन बाजारात येताच अनेक जणांचा खरेदीकडे कल असतो. इतर कोणत्याही स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनची रचना वेगळी आणि आकर्षित आहे. त्यामुळे अनेकांसाठी हा फोन आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

| Sakal