बिलाच्या वरच्या भागात एक कोड लिहिलेला असतो. यावर R,C ही लेटर्स आणि काही आकडे असतात.
R म्हणजे repeat bill एका ग्राहकाने किती बिल बनवले आहे.
T म्हणजे trolly संख्या, C म्हणजे carry bag ची संख्या.
डी मार्टची किंवा त्या दुकानाची पिशवी पैसे देऊन घेतली असेल तर त्याचीही खूण असते.
काही वेळा चुकून काही वस्तू स्कॅन होत नाहीत किंवा एकच वस्तू जास्त स्कॅन होते अशा वेळी शक्य होईल तितके बिल आणि वस्तूंकडे बघतात.
सिक्युरिटी स्टाफ चे काम आहे बिलिंग काउंटरच्या कामाकडे लक्ष देणे. त्यातून वस्तू स्वस्त असून सुद्धा काही जण चोरी करतच असतात.
आणि एकावर एक फ्री असेल तर काही जण दुसरा नग स्कॅन करत नाहीत.
त्यांना वाटतं एकच स्कॅन केल्यावर दुसरा स्कॅन करण्याची गरज नाही पण एकच नग घेतल्यावर त्या वस्तूवर 50 टक्यांची सूट मिळते हे कमी लोकांना माहिती आहे अशा वस्तू पण चेक कराव्या लागतात.