साडीमध्ये प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य हे खुलून दिसतं.
आपली संस्कृती आणि वारसा जपण्यात साडी या वस्त्राचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे ते आणखी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते.
पण हल्ली साडी ही आवडी निवडी प्रमाणे नेसली जाते.
भारतात सत्तर टक्के विवाहीत स्त्रिया साडी नेसतात.
साडीमध्ये स्त्री ही विचाराने परीपक्व वाटते. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून उठतं.
आता तर एक नवीन ट्रेंड आलाय की प्रत्येक सणावाराला स्त्रिया आवडीने साडी नेसतात आणि फोटोसेशन करताना दिसतात
मुळात वेगवेगळ्या प्रातांनुसार साडी घालण्याची पद्धतही वेगवेगळी आहे.
पण साडीचं वेड हे दिवसेंदिवस वाढत आहे, हे तितकंच छान आहे.
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडी नेसणं ही एक चॉइस असावी, जबरदस्ती नाही.