हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, त्यामुळे त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते.
या ऋतूमध्ये कोरडेपणापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या टिप्स फॉलो करू शकता.
हिवाळ्यात तुमचे स्किनकेअर रुटीन अशा प्रकारे अपग्रेड करा.
डबल क्लींजिंग - हिवाळ्यात डबल क्लींजिंग करावे. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. आणि आपली त्वचा हायड्रेटेडही राहते.
फेस ऑइल - हिवाळ्यात त्वचेसाठी फेस ऑइलचा वापर करावा. यामध्ये आर्गन ऑइल, रोझ हिप सीड ऑइल आणि ॲव्होकॅडो ऑइल असते.
स्क्रबिंग - मृतपेशी आणि ब्लॅकहेट काढण्यासाठी याची आवश्यकता असते. पण त्वचा कोरडी झालेली असल्याने सौम्य स्क्रबर वापरावं.
मॉयश्चरायझर - हिवाळ्यात हायड्रेटिंग मॉइश्चरायझरचा वापर करावा. हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी होते.