तुमच्या हे कधी लक्षात आलंय का की महिलांच्या जीन्सचे खिसे छोटे असतात.
महिलांच्या कपड्यांना खिसा नसल्यास त्यांची गैरसोय होते.
महिलांच्या जीन्सला खिसे नसण्याचे कारण व्हिक्टोरियन काळाशी संबंधित आहे.
कॉर्सेट्सच्या काळात महिला असे कपडे घालत ज्यात त्यांची फिगर नीट दिसेल. त्यामुळे खिशांऐवजी एक बटवा त्यांच्या कंबरेला बांधला जाई.
काळानुसार महिला घट्ट गाऊन घालू लागल्या ज्यात खिसे नसत.
त्यामुळे महिला छोट्या पर्स घेऊन फिरू लागल्या.
छोटी पर्स म्हणजे उच्चभ्रू आणि मोठे खिसे म्हणजे कष्टकरी महिला असा भेद निर्माण झाला.
नंतर पुरुषांप्रमाणेच महिलांच्या जीन्सलाही मोठे खिसे आले. नंतरच्या काळात फिगर नीट दिसावी म्हणून खिसे छोटे होत गेले.