कांजीवरम साड्यांमध्ये व्हरायटी खूप असते. अरूंद काठाची , टेंपल बॉर्डर किंवा रेखा नेसते तशी मोठ्ठ्या काठाची टेंपल बॉर्डर, एक ना दोन.
पोचमपल्ली म्हणजेच पोचमपल्ली इकत या साड्या सध्याच्या तेलंगणा राज्यातल्या भूदान पोचमपल्ली या गावात बनवल्या जातात.
पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू. पदराच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते. तसंच पारंपारिक पैठण्या या नवीन पानाफुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात.
इल्कल/इरकल साडी पूर्वी घराघरांतल्या आज्यांकडे अशा साड्या पुष्कळ असत. इल्कल सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते.
बनारसी साडीला महाराष्ट्रात वेगळंच महत्व आहे. आपल्याकडे लग्नामध्ये वापरला जाणारा शालू म्हणजे बनारसी सिल्कचा एक प्रकार. त्यात इतरही बरेच प्रकार येतात.
फक्त हीच साडी म्हणजे टसर सिल्क असं म्हणता येणं अवघड आहे. प्रिंटेड टसर, कांथा वर्क केलेली टसर, नुसतीच पानाफुलांच्या वेलबुट्टीची टसर असे खूपच प्रकार सांगता येतील.
मुग्गा नावाच्या रेशमी किड्याच्या कोशापासून बनवलेल्या या मुग्गा सिल्क साड्या आसामची खासियत आहे. नेहमीच्या पाचवारी गोल साडीसोबतच मुग्गा सिल्कमधले मेखेला चादोर फार प्रसिद्ध आहेत.
माहेश्वरी साडी हा कॉटन आणि रेशमी धागे एकत्र विणलेला तलम प्रकार आहे. मध्यप्रदेशातल्या माहेश्वर गावच्या या साड्या वजनाला हलक्या आणि वापरायला सुटसुटीत.