World Vada Pav Day : खाता का नेता? चटपटीत वडापावची स्टोरी वाचा

| Sakal

आज 23 ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिवस साजरा केला जातो. हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे.

| Sakal

मुंबईत आज दिवस-रात्र विकला जाणारा वडापाव सुरुवातीला फक्त सहा ते सात तासांसाठी उपलब्ध होता.

| Sakal

दादर, परळ, गिरगाव इत्यादी ठिकाणी मराठी रेस्टॉरंट्सची संख्या वाढल्यानंतर बटाटावड्याला मुंबईत घर मिळाले.

| Sakal

वडापावचा जन्म 1966 मध्ये दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या फूड ट्रकमध्ये झाल्याचे मानले जाते.

| Sakal

1970 ते 1980 च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहू लागले.

| Sakal

वडापाव सुरू झाला तेव्हा तो 10 पैशांना विकला जात होता. आज तो तुम्हाला हे 10 ते 80 रुपयांपासून 100 रुपयांना मिळतो.

| Sakal

अनेक ठिकाणी आता तो वेगवेगळ्या नावाने आणि चवीन उपलब्ध झाला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यातही तो वेगळ्या चवीन मिळतो.

| Sakal

रिझवी कॉलेज, मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2010 रोजी लंडनमध्ये वडा पाव हॉटेल सुरू केले. ठाण्यातील सुजय सोहनी आणि वडाळ्यातील सुबोध जोशी यांनी मिळून हे हॉटेल सुरू केले.

| Sakal