ऑस्ट्रेलियाने 1880 मध्ये इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता.
कांगारूंनी द ओव्हलवर आतापर्यंत 38 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र त्यातील फक्त 7 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.
ओव्हलवर ऑस्ट्रेलियाचे विनिंग पर्सेंटेज 18.42 टक्के इतके आहे. इंग्लंडमधील इतर मैदानाच्या तुलनेत ओव्हलवर कांगारूंची कामगिरी सुमारच असते.
गेल्या 50 वर्षात ऑस्ट्रेलियाने ओव्हलवर फक्त 2 कसोटी सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्सवर 29 कसोटी सामने खेळले असून त्यातील 17 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. या मैदानावर त्याचा सक्सेस रेट 43.59 टक्के इतका आहे.
भारताचे ओव्हलवरचे रेकॉर्ड काढले तर तेही काही उत्साहवर्धक नाही. ओव्हलवर भारताने दोन कसोटीत विजय, 7 कसोटी ड्रॉ तर 5 कसोटी सामने गमावले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2021 मध्ये इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला होता. हा भारताचा 40 वर्षानंतरचा ओव्हलवरचा पहिला विजय होता.