YOGA DAY : मराठी तारका आणि योगाचे काय आहे कनेक्शन...

सकाळ डिजिटल टीम

योगसाधना

व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।

व्यायामामुळे सुख, शांती मिळते आणि आयुर्मानात वाढ होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत जर चेहऱ्यावरच हास्य आणि समाधान कायम ठेवायच असेल तर योगसाधने शिवाय पर्याय नाही.

YOGA DAY | SAKAL

योग दिवस

योगासने आणि योग हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि आपल्या संस्कृतीची ही जगाला देणगी आहे.

YOGA DAY | SAKAL

योग दिवस

आपण योग दिवस जूनमध्ये का साजरा करतो तुम्हाला माहिती आहे का?

भारतीय संस्कृती नुसार ग्रीष्म संक्राती नंतर सूर्य हा दक्षिणायनात जातो. ही वेळ योग साधने साठी योग्य असते. त्यामुळे आपल्याकडे 2014 पासून २१ जून हा आंतर राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.

YOGA DAY | SAKAL

सूर्यनमस्कार

एकदाच मिळालेलं हे आयुष्य आरोग्यदायी करण्यासाठी आणि सार्थकी लावण्यासाठी योगासने नक्की करावीत. अगदी काहीच नाही तरी रोज सूर्यनमस्कार तरी घालावेत. त्यामुळे मन शांत आणि एकाग्र होतं. thi

YOGA DAY | SAKAL

थीम

आपली यावर्षी ची आंतर राष्ट्रीय योग दिनाची थीम 'वन वर्ल्ड वन हेल्थ' ही आहे.

YOGA DAY | SAKAL

अमृता खानविलकर

मराठी सिनेसृष्टीची 'चंद्रा' म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या फिटनेसचं रहस्य योगासनं असल्याचं सांगते. अमृता खानविलकर अभिनेत्रीबरोबरच उत्तमस नर्तिकाही आहेच. हे कौशल्य केवळ योगासनांतून मिळणाऱ्या फिटनेसमुळे असल्याचं तिचं म्हणणं आहे.

YOGA DAY | SAKAL

अनिता दाते :

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता धनुरासन करत आहे.

धनुरासन :तुम्हाला माहीत आहेत का फायदे?

धनुरासन केल्याने रक्ताभिसरण सुधारते. जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

YOGA DAY | SAKAL

सोनाली कुलकर्णी :

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीसुद्धा योगासने आणि योगसाधना नियमीत करते. ती चक्रासन करताना दिसत आहे.

चक्रासन : या आसनामुळे वजन तर कमी होतेच पण चेहऱ्यावर तेजही फुलते.

YOGA DAY | SAKAL

ईशा केसकर :

'जय मल्हार' मालिकेतील 'बानुबाई'ची भूमिका करणारी ईशा केसकर वृक्षासन करताना.

वृक्षासनाचे फायदे : शारीरिक संतुलन वाढावे यासाठी हे आसन केलं जातं. हे आसन म्हणजे ध्यानधारणा केल्यासारखंच आहे. ताण, तणाव, काळज्या असल्यास ते जरूर करावे.

YOGA DAY | SAKAL

हास्य जत्रेचे महासम्राट या कार्यक्रमात जोरजोरात हसत राहणाऱ्या आणि सदाबहार दिसणाऱ्या प्राजक्ताच्या या हास्यामागचं गुपित आहे, योगासने. प्राजक्ता रोज योगासने तर करतेच पण त्याचबरोबर नवनवीन आसने करून पाहणं, त्यात नैपुण्य मिळवणे तिला आवडते.

बकासन :अवघड आहे पण अशक्य नाही. सातत्याने प्रयत्न केला तर नक्की जमेल.

फायदे : या आसनाने तुमच्या शरीराचे संतुलन कायम राहते. आणि एकाग्रता वाढीस लागते. तुमचे मन आणि शरीर आव्हानांसाठी तयार होऊ लागते. 

YOGA DAY | SAKAL

हनुमानासन

'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्री सायली संजीव हनुमानासन करताना.

पाय आणि कंबरेमधील रक्त प्रवाह गतिमान करते. डिप्रेशन दूर करण्यातही या आसनाचा फायदा होते.

YOGA DAY | SAKAL

happy international yoga day to all..

आयुष्याला चांगल्या वाटेवर नेण्याची एक नवी सुरूवात करूया..

थीम :वन वर्ल्ड वन हेल्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YOGA DAY | SAKAL