तारुण्य टिकवण्यासाठी 'या' गोष्टी आहारात घ्या

| Sakal

साजूक तूपात जास्त ताकद आहे. ते तुम्हाला म्हातारपणापासून दूर ठेवते. वय झालं तरी तुमचं तारुण्य आबादित राहते. पूर्वी स्त्रिया आणि पुरुष आपल्या दररोजच्या आहारात साजूक तूपावर जास्त भर देत होते.

| Sakal

अश्वगंधा आरोग्यासाठी लाभदायक आहे. अश्वगंधा पावडर सेवन केल्यानं शरीरात टेस्टोस्टेरॉनची वाढ होते. त्यामुळे शरीर आणि इंद्रियांना मजबुती मिळते. टेस्टोस्टेरॉनला पुरुष संप्रेरक मानले जाते.

| Sakal

आवळा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा खाल्ल्यानं डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. दररोज एक हिरवे फळ खावे. आवळ्याचा रस त्वचा आणि केसांवर लावू शकता. आवळा सेवनानं केस काळे होतात.

| Sakal

केळीमध्ये जीवनसत्त्वं आणि खनिज पदार्थांचा खजिना आहे. केळी खाल्ल्यानं संपूर्ण शरीरावर पोषण होते. म्हणजेच आपल्या केसांपासून आपल्या स्नायूंपर्यंत सर्व शरीर निरोगी राहते. पण तुम्हाल शुगरची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

| Sakal

हळद ही आयुर्वेदीक औषधी आहे. दररोजच्या आहारात हळद पावडर वापरली जाते. हळद ही रोग प्रतिकारक आहे. हळद दुधामध्ये मिसळून प्यायल्यामुळे तसेच त्वचेवर लावल्यास वृद्धत्वाचा परिणाम कमी होतो.

| Sakal

फणस हे आरोग्यवर्धक फळ आहे. कच्च्या फणसाची भाजी आणि लोणचे देखील केले जाते. फणसामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे-ए, बी, सी आणि तांबे आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. फणस सेवनामुळे त्वचा, केस आणि त्वचेची चमक वाढते.

| Sakal