चहल ते ब्रॅडमन! 'या' 5 क्रिकेटपटूंनी इतर खेळातही आजमावला हात

| Sakal

आपल्या आजूबाजूला अनेक 'जॅक फॉर ऑल' अशी धाटणीची माणसं असतात. अशाच प्रकारचं व्यक्तीमत्व म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स. त्याने हॉकी, रग्बी, बॅडमिंटन, स्क्वाश अशा अनेक खेळांमध्ये आपला हात आजमावला.

| Sakal

डिव्हिलियर्सची पुढची आवृत्ती म्हणजे अॅश्लेघ बार्टी. तिची जरी क्रिकेटमधील मजल बीग बॅशपर्यंतची असली तरी तिने टेनिसमध्ये चांगला जम बसवला. त्यानंतर टेनिसमधूनही निवृत्ती घेत आता गोल्फमध्ये आपला हात आजमावत आहे.

| Sakal

एलिसा पेरी (Football) : एलिसा पेरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या एक महिना आधीपर्यंत फुटबॉल खेळत होती. तिने 2011 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ती ऑस्ट्रेलियाची क्रिकेट आणि फुटबॉल अशा दोन्ही खेळातील वर्ल्डकप खेळणारी पहिली खेळाडू ठरली होती.

| Sakal

युझवेंद्र चहल (Chess) : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आपल्या विनोदबुद्धीसाठी देखील ओळखला जातो. मात्र त्याने देखील 2002 मध्ये 12 वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेत ती जिंकली देखील होती.

| Sakal

सर डॉन ब्रॅडमन (Squash) : सर डॉन ब्रॅडमन ज्या काळात क्रिकेट खेळत होते त्या काळात सातत्याने कसोटी सामने खेळले जात नव्हते. 1934 मध्ये ब्रॅडमन अॅडलेडला शिफ्ट झाले आणि स्क्वाश खेळाकडे ओढले गेले. त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलिया स्क्वाश स्पर्धेत देखील यश मिळवले. तसेच ते बिलियर्ड्स आणि गोल्फ देखील खेळत होते. ते वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत व्यावसायिक गोल्फ खेळत होते.

| Sakal

सर व्हीव रिचर्ड्स (Football) : वेस्ट इंडीजचे सर्वात डॅशिंग फलंदाज व्हीव रिचर्ड्स यांनी क्रिकेट सोबत फुटबॉलमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी 1974 मध्ये अँटिग्वाकडून फिफा वर्ल्डकपची पात्रता फेरी देखील खेळली आहे. मात्र अँटिग्वा ग्रुपमध्ये तळात राहिली आणि क्रिकेट जगताला व्हीव रिचर्ड्स मिळाले.

| Sakal

जॉन्टी रोड्स (Hockey) : जॉन्टी रोड्स हा आपल्या फिटनेस आणि फिल्डिंगसाठी जगविख्यात आहे. मात्र क्रिकेटकडे वळण्यापूर्वी जॉन्टी रोड्स हा हॉकी खेळत होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हॉकी संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. मात्र 1992 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका पात्र होऊ शकली नव्हती.

| Sakal