मोड आलेल्या कडधान्यांच्या ९ हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा

सकाळ डिजिटल टीम

हल्लीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश जण सकाळचा नाश्ता करणेच टाळतात किंवा नाश्ता करतात पण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील अशा पदार्थांचा समावेश सहसा केलाच जात नाही. कित्येक जण नाश्त्यामध्ये बटाटावडा, सामोसा अशा तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते.

पण याऐवजी ब्रेकफास्टमध्ये हेल्दी पर्यायांचा समावेश केल्यास आरोग्यास पोषकघटकांचा पुरवठाही होईल. नाश्त्याचा साधासोपा व हेल्दी उपाय म्हणजे तुम्ही मोड आलेले कडधान्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता. जाणून घेऊया नऊ साध्यासोप्या रेसिपी..

1. स्प्राऊट सॅलेड : मोड आलेले कडधान्य, कांदा, टोमॅटो, कोथिंबिर, काकडी किंवा तुमच्या आवडीनुसार अन्य भाज्याही मिक्स करू हे साधेसोपे आणि टेस्टी सॅलेड तयार करा. चवीनुसार लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करावे.

2. स्प्राउट स्टर फ्राय - मोड आलेले कडधान्य, बेल पेपर, कांदा आणि तुमच्या आवडीचे मसाले या मिक्स करून या हेल्दी सॅलेडचा आस्वाद घ्यावा.

3. स्प्राउट आणि व्हेजिटेबल सूप : मोड आलेले कडधान्य आणि वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करून  सूप तयार करा.

4. स्प्राउट रॅप : मोड आलेले कडधान्ये, अॅव्होकाडोचे काप, काकडी, टोमॅटोचे स्लाइस गव्हाच्या पोळीवर ठेवा आणि त्याचे रॅप तयार करा. ही हेल्दी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.  

5.स्प्राउट करी : मोड आलेले वेगवेगळे कडधान्य, कांदा, टोमॅटो आणि ओल्या नारळाचे दूध एकत्रित करा. आवडीनुसार मीठ, मसालेही मिक्स करून करी तयार करा.

6. स्प्राउट पॅनकेक : मोड आलेले कडधान्य मिक्समध्ये वाटा, यानंतर चण्याच्या पिठात कोथिंबीर-मसल्यांसह हे मिश्रण मिक्स करा. तेलात हे मिश्रण तळून चटणी किंवा दह्यासोबत पॅनकेकचा आस्वाद घ्या.

7. स्प्राउट स्मूदी : मोड आलेले कडधान्य केळे, बेरीज् आणि बदामाच्या दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेले मिश्रण एका ग्लासमध्ये गाळा व यानंतर प्यावे.

8. उकडलेले कडधान्ये : मोड आलेले वेगवेगळे कडधान्य पाण्यात उकळा. यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करा व त्याचा आस्वाद घ्यावा.

9.  स्प्राउट टिक्की :  मोड आलेल्या कडधान्यांची टिक्कीही आपण करून खाऊ शकता. याद्वारेही आरोग्यास कित्येक पोषक घटकांचा पुरवठा होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.