Kala Chana Sandwich : सँडविचला बनवा हेल्दी तेही सोप्या पद्धतीने, लगेच नोट करा प्रोटीनयुक्त सँडविचची रेसिपी

काळ्या चण्याचे सँडविच कसे बनवायचे ते जाणून घ्या
Kala Chana Sandwich
Kala Chana Sandwichesakal

Kala Chana Sandwich : लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडणाऱ्या पदार्थांपैकी एमक म्हणजे सँडविच. मात्र सँडविच हेल्दी, चटपटीत आणि टेस्टी असेल तर ते खाण्याची मज्जाही दुप्पट येईल. शरीरात फॅट्स वाढ करणारे मेओनिज, चिज नव्हे तर प्रोटीनयुक्त काळ्या चण्यांपासून सँडविच कसे बनवायचे याची सोपी रेसिपी आज आपण जाणून घेऊयात. हे सँडविच पटकन तयार होतं आणि नाश्त्या म्हणून तुम्ही ते टिफिनवरही नेऊ शकता. रोजच्या न्याहारीतून ब्रेक घेऊन काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खाण्यासाठी हे सँडविच बनवा.

सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेडचे तुकडे

उकडलेले काळे हरभरे

लसूण

कांदा

टोमॅटो

काकडी

हिरवी चटणी

दही

सॉस

मीठ आणि मिरपूड

जिरे पावडर

काश्मिरी लाल मिरची पावडर

पिझ्झा मसाला

कोथिंबीरीची पाने

पॅनकेक्स

तीळ (Food)

Kala Chana Sandwich
Healthy Recipe : आरबट-चरबट खाण्यापेक्षा दिवसाची सुरूवात हेल्दी पालक इडलीने करा!

चना सँडविच कसा बनवायचा

हे सँडविच बनवण्यासाठी हरभरे चांगले उकळा. हरभरा उकळत असताना कांदा आणि लसूण बारीक चिरून घ्या. आता एका भांड्यात काळे हरभरे घ्या आणि त्यात चिरलेला लसूण, कांदा, दही, सॉस सोबत मीठ आणि काळी मिरी घाला आणि मिक्स करा, मिक्स करताना हरभरा देखील मॅश करा. आता पनीरचे तुकडे करा आणि तेलात तीळ घालून तळून घ्या, थोडे मीठ आणि काळी मिरी त्यात घाला. आता ब्रेड स्लाइस टोस्ट करा, नंतर हरभरा मिक्स, पनीर, टोमॅटो, काकडी, हिरव्या चटणीची पेस्ट स्लायसेसला लावा. (Recipe)

आता याचे काप करून सँडविचचा आनंद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com