Monika Lonkar –Kumbhar
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे.
अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर १९८४ मध्ये इंदूरमधील एका मराठी कुटुंबात झाला होता.
अंकिताचे खरे नाव तनुजा असे आहे. इतर कलाकारांप्रमाणे टिव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अंकिताने देखील तिचे नाव बदलले आणि अंकिता लोखंडे असे ठेवले.
अंकिताने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिने दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अर्चना या प्रमुख भूमिकेत काम केले होते. या दोघांची ही पहिलीच मालिका चांगलीच गाजली होती.
पवित्र रिश्ता या मालिकेनंतर अंकिताने अनेक रिआलिटी शोजमध्ये काम केले. त्यानंतर, तिने 'मणिकर्निका : द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत हे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २०२१ मध्ये अंकिताने व्यावसायिक विकी जैनसोबत थाटामाटात लग्न केले.
सध्या अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी बिगबॉस १७ मध्ये सहभागी झाली आहे. या शोममुळे यांची जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.