पेशव्यांना एक शिवी आणि बाजीरावाने अख्या पोर्तुगीज सत्तेला धडा शिकवला

सकाळ वृत्तसेवा

गोऱ्या रंगाचा अहंकार, पेशव्यांचं प्रतिउत्तर

पोर्तुगीज गव्हर्नरने बाजीराव पेशव्याला "निग्रो" म्हणत अपमान केला. या एका अपशब्दातून इतिहास घडला...

Bajirao Peshwa | esakal

बाजीराव पेशवे – पराक्रमी व मुत्सद्दी

शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे खऱ्या अर्थाने विस्तारक ठरले बाजीराव पेशवे. युद्धात अजिंक्य, राजकारणात कुशल.

Bajirao Peshwa | esakal

पोर्तुगीजांचा जुलमी कारभार

साष्टी, वसई, गोवा भागांत पोर्तुगीजांचा अंमल होता. हिंदूंवर अत्याचार, मंदिरांची तोडफोड, धर्मांतर सक्ती होती.

Bajirao Peshwa | esakal

तहाला हरताळ, पेशव्यांचा अपमान

१७३२ च्या तहानुसार मराठ्यांना वखार उभारण्याचा अधिकार होता. पण पोर्तुगीज गव्हर्नरने तो नाकारला आणि अपमान केला.

Bajirao Peshwa | esakal

‘निग्रो’ म्हणत पेशव्यांचा अपमान

गव्हर्नरच्या पुतण्याने मराठी वकिलाचा अपमान केला आणि पत्रात बाजीरावांना "निग्रो" म्हणत शिवी दिली.

Bajirao Peshwa | esakal

चिमाजी अप्पांचा बदला घेण्याचा निर्धार

या अपमानाचा बदला घेण्यासाठी बाजीरावांनी चिमाजी अप्पांवर जबाबदारी सोपवली. मोहिमेची तयारी पुण्यात गुप्तपणे सुरू झाली.

Bajirao Peshwa | Sakal

वसई मोहिमेची सुसज्ज तयारी

शंकराजी पंत, गंगाजी नाईक, खंडोजी मानकर, माणोजी आंग्रे, होळकर, शिंदे – सगळे मराठे सेनानी सज्ज झाले.

Bajirao Peshwa | Sakal

ठाण्यापासून वसईपर्यंत धडक मोहीम

१७३७ मध्ये ठाण्याहून मोहिमेला सुरुवात झाली. अर्नाळा, धारावी, साष्टी जिंकत चिमाजी अप्पा वसईवर चालून गेले.

Bajirao Peshwa | esakal

वसईचा विजय – मराठा पराक्रमाचा शिखर

कडवट लढाईनंतर वसई किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांचा संपूर्ण किनारपट्टीवरील प्रभाव डळमळीत झाला.

Bajirao Peshwa | ESakal

अपशब्दासाठी किंमत

एका अपशब्दामुळे पोर्तुगीजांना अपमानासह पराभव पत्करावा लागला. पेशव्यांनी त्यांना राजशिष्टाचार शिकवला.

Bajirao Peshwa | Sakal

मराठेशाहीमध्ये व्यायाम प्रकार कोणते होते? इंग्रज पाहुण्याने लिहिलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा