Pranali Kodre
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच प्रसिद्ध बिझनेसमन रवी घई यांची नात सानिया चंदोक हिच्यासोबत साखरपुडा झाल्याची चर्चा आहे.
त्यामुळे अर्जुन तेंडुलकर अचानक चर्चेचा भाग बनला. दरम्यान अर्जुनही वडिलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये करियर घडवत आहे.
अर्जुन डावखुरा असून अष्टपैलू खेळाडू आहे. तो विशेषत: वेगवान गोलंदाजी करतो, तर मधल्या किंवा तळातल्या फळीत फलंदाजीला येतो.
अर्जुनने अतुल गायकवाड आणि सुब्रतो बॅनर्जी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. अर्जुनने २०१७ मध्ये महिला वर्ल्ड कप वेळी भारतीय संघातील खेळाडूंना नेट्समध्ये गोलंदाजीही केली होती.
अर्जुन बऱ्याचदा इंग्लंडमध्ये दिसला असून तो MCC संघाकडूनही खेळला आहे. तो २०१८ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील कसोटी संघाचाही भाग राहिला आहे.
अर्जुन वयोगटातील क्रिकेट मुंबईकडून खेळला असून त्याने कुच बिहार ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत १९ वर्षांखालील मुंबई संघाकडून खेळताना २०१७-१८ हंगामात ५ सामन्यातच १९ विकेट्स घेतल्या होत्या.
अर्जुनने २०२१ मध्ये मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून टी२० सामन्यातून हरियानाविरुद्ध पदार्पण केले होते. मात्र त्याला मुंबई संघात अधिक संधी नसल्याने त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
अर्जुनने गोव्याकडून २०२२ मध्ये रणजी ट्रॉफीतून राजस्थानविरुद्ध पदार्पण केले. पदार्पणातच त्याने शतक केले होते. तेव्हापासून गोव्याकडूनच खेळतो.
अर्जुनल मुंबई इंडियन्सने २०२१ आयपीएलमध्ये २० लाखांच्या किंमतीत खरेदी केले, तेव्हापासून तो या संघाचा भाग राहिला आहे.
अर्जुनने १७ प्रथम श्रेणी सामने, १८ लिस्ट ए सामने आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७ विकेट्स, लिस्ट ए मध्ये २५ विकेट्स आणि टी२० क्रिकेटमध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत ७०० हून अधिक धावा केल्या आहेत.
अर्जुनने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याने ५ आयपीएल सामने खेळले असून ३ विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.