परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगोंचं ब्रिटिशकालीन देवापूर तलावात आगमन

सकाळ डिजिटल टीम

हजारो किलोमीटरचा प्रवास

परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून, देवापूर परिसरात स्थलांतर करणाऱ्या, गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचं खास आकर्षण ठरणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो पक्षांचं आगमन होण्यास सुरुवात झालीये.

Flamingo Birds

फ्लेमिंगो पक्षांचं आगमन

सातारा-सांगली-सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या देवापूर (ता. माण) येथील ब्रिटिशकालीन तलावावर रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्षांचं आगमन झालं आहे.

Flamingo Birds

निरीक्षणासाठी पक्षीप्रेमी दाखल

या पक्षांचं निरीक्षण करण्यासाठी सातारा-सांगली-कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथून पक्षीप्रेमी दाखल होत आहेत.

Flamingo Birds

बदकांचाही मुक्त विहार

या तलावात फ्लेमिंगो बरोबरच बार हेडेड गूज, मुग्धबालक, गोल्डन डक, वेगवेगळ्या प्रकारची बदके मुक्त विहार करीत आहेत.

Flamingo Birds

देवापूरला कसे जाल?

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर असणाऱ्या म्हसवड शहरापासून देवापूर तलाव हा सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहे.

Flamingo Birds

विविध प्रजातींचे पक्षीही तलावात

रोहित पक्ष्यांसह विविध प्रजातींचे पक्षीही या परिसरात त्यांच्या वसाहती थाटताहेत.

Flamingo Birds

रोहित पक्षी ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

बगळ्यासारखी उंची, अग्निपंख, काटकीसारखे लांब पाय, उंच मान आणि रुबाबदारपणा यामुळे रोहित पक्षी हा पक्षीनिरीक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. (फोटो : अंकुश चव्हाण)

Flamingo Birds

उपमुख्यमंत्र्यांसोबत उदयनराजेंनी अनुभवली 'बैलगाडी सफर'; पाहा PHOTO

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.