येरळवाडीत उतरली 'हिमालयीन एअरलाइन'; पट्टेरी हंसाचं आगमन, तलाव झाला रंगीबेरंगी

अंकुश चव्हाण

कलेढोण : जगात सर्वाधिक उंचीवरच्या शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवरूनही उडणारा, सलग १७ तास हवेत अंतर कापणारा ‘द हिमालयीन एअरलाइन’ अर्थात बार हेडेड गूज.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

मराठीत पट्टेरी हंस आणि पट्टकादंब नावाने प्रसिद्ध असणाऱ्या २७ परदेशी पक्ष्यांनी येरळवाडी (ता. खटाव) येथे आगमन केले आहे.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

मागील आठवड्यात हजेरी लावलेल्या फ्लेमिंगोच्या स्थलांतरानंतर पट्टेरी हंसाच्या आगमनानंतर पक्षीमित्रांच्यात आनंद वातावरण पसरले आहे.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी, कानकात्रे या तलावात दरवर्षी देशी-विदेशी पक्षी हजेरी लावतात. यातील येरळवाडीवाडी तलावात मागील आठवड्यात फ्लेमिंगोंनी हजेरी लावली होती.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

मात्र, त्यांच्या आगमनानंतर हे पक्षी पुन्हा स्थलातंरित झाल्याने पक्षीप्रेमींच्यात नाराज पसरली. मात्र, या पक्ष्याची जागा आणखी परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी भरून काढली आहे.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

या तलावात पश्‍चिमेच्या उथळ, पाणथळ जागेत अन्नाच्या शोधात पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. त्यात जगात सर्वाधिक उंचीच्या ‘माऊंट एव्हरेस्ट’ या शिखरावरूनही झेपावणारा पट्टेरी हंस हा तलावाचे मुख्य आकर्षण झाले आहे.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

त्याची ‘द हिमालयीन एअरलाइन’ म्हणूनही पक्षी जगतात ओळख आहे. हा पक्षी सलग १७ तासांचा न थांबता प्रवास करतो म्हणून त्यास द हिमालयीन ट्रान्स असेही म्हणतात.

Headed Goose Birds at Yeralwadi lake

'या' दिग्गज अभिनेत्रीला वयाच्या 17 व्या वर्षी गमवावा लागला पाय, पण ती कधीच हिंमत हरली नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.