बाबासाहेबांच्या हयातीत सुरु झालेला १४ एप्रिलचा सोहळा, पुण्यातूनच सुरू झाली जयंतीची प्रथा

Shubham Banubakode

बाबासाहेबांची जयंती

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी केली जाते.

Babasaheb Ambedkar Jayanti History

पहिली जयंती कुणी साजरी केली?

पण बाबासाहेबांची पहिली जयंती कुणी साजरी केली होती, हे तुम्हाला माहिती आहे का?

Babasaheb Ambedkar Jayanti History

बाबासाहेबांचा वाढदिवस

डॉ. आंबेडकर हयात असतानाच १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात पहिल्यांदा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

Babasaheb Ambedkar Jayanti History

कुणी घेतला होता पुढाकार?

सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुढाकार घेतला होता. ते त्यावेळी खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष होते.

Babasaheb Ambedkar Jayanti History

जयंतीची सुरुवात कुणी केली?

पुढे बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या जयंतीची प्रथाही रणपिसे यांनीच सुरू केली. त्यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

Babasaheb Ambedkar Jayanti History

भीमजयंतीची प्रथा

त्यानंतर खडकी भागातील प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी होऊ लागली.

Babasaheb Ambedkar Jayanti History

दलित मंडळाची स्थापना

या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली.

Babasaheb Ambedkar Jayanti History

भीमजयंतीची सुरुवात

अशा प्रकारे भारतासह जगभरात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीची परंपरा सुरू झाली.

Babasaheb Ambedkar Jayanti History

|

esakal

इराण-इस्रायल युद्धाबाबत डॉ. आंबेडकरांची भविष्यवाणी खरी ठरली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

हेही वाचा -