हाताने खाण्याचे काय आहेत फायदे?

Sudesh

अन्न

आपल्या संस्कृतीमध्ये अन्न हे 'पूर्णब्रह्म' मानलं जातं. हाताने जेवण करण्याची भारतात परंपरा आहे.

Eating with Hands | eSakal

फायदा

मात्र, ही केवळ परंपरा किंवा सवय नसून, आपल्या आरोग्यासाठी हे भरपूर फायद्याचं आहे.

Eating with Hands | eSakal

स्पर्श

काटा-चमचा-सुरी अशा उपकरणांऐवजी प्रत्यक्ष स्पर्शकृतीने अन्न खाल्ल्यास आरोग्याला आश्चर्यकारक फायदे होतात.

Eating with Hands | eSakal

विचारपूर्वक

हाताने खाताना अगदी विचारपूर्वक खाल्ले जाते. हातात घास घेतल्यानंतर आपण काय खातोय याबाबत स्पर्शज्ञान आणि मानसिक एकाग्रता येते.

Eating with Hands | eSakal

जठराग्नी

आयुर्वेदामध्ये हात म्हणजे पाच तत्वांचे विस्तारीत रुप मानले जाते. त्यामुळे हाताने जेवताना बोटांमधील पंचतत्वांमुळे जठराग्नी उत्तेजित होतो.

Eating with Hands | eSakal

पचन

बोटांमधून अन्नाबाबतची उत्तेजना पोटापर्यंत पोहोचते. ही उत्तेजना पचनसंस्थेला येणाऱ्या अन्नासाठी तयार राहण्यास सांगते, आणि त्यामुळे योग्य पचन होते.

Eating with Hands | eSakal

स्वच्छता

हाताने खाताना आपण खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. काटा-चमचाच्या बाबतीत अशी खबरदारी घेतलीच जाते असं नाही. त्यामुळे हाताने जेवणं अधिक स्वच्छ असतं.

Eating with Hands | eSakal

पोट भरणे

हाताने खाताना स्पर्शकृतीने मेंदूला दिलेल्या अभिप्रायामुळे पोट भरल्याची जाणीव होते. त्यामुळे योग्य प्रमाणात अन्न खाल्ले जाते.

Eating with Hands | eSakal

मधुमेहींना तज्ज्ञांचा गंभीर इशारा; 'मोमोज'ने वाढेल साखर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Momo Diabetes Danger | eSakal