Met Gala 2024 : 'या' सेलिब्रिटीजच्या भन्नाट लुक्सने वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

बहुप्रतीक्षित मेट गाला २०२४ ला दणक्यात सुरुवात झाली. 'Garden of time' ही यंदाची थीम असून सेलिब्रिटीजनी भन्नाट अंदाजात यंदाच्या गालाला हजेरी लावली.

मेट गालाला हजेरी लावलेल्या सगळ्या सेलिब्रिटीजचे लुक्स चर्चेत आहेत पण बऱ्याच जणांच्या भन्नाट लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पाहूया मेट गाला २०२४मधील सेलिब्रिटीजचे चर्चेत राहिलेले लुक्स.

अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका झेंडेया हिने ब्लॅक रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये हजेरी लावली. ऑफ शोल्डर लॉन्ग गाऊन, फुलांची हॅट या लूकमध्ये ती Gorgeous दिसत होती.

अमेरिकन कार्डी बी नेहमीच तिच्या हटके लुक्समुळे चर्चेत असते. यावेळी कार्डीने ब्लॅक रंगाचा गाऊन घातला होता पण त्यावर तिने घातलेलय हिरव्या नेकलेस आणि तिच्या हिरव्या नेल्सनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अमेरिकन सिंगर आणि अभिनेत्री सब्रीना कारपेंटर हिने ब्लॅक अँड ब्लु बॉल गाऊनमध्ये हजेरी लावत सगळ्यांची वाहवा मिळवली.

सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री आलिया भट्टच्या लूकची. मिंट ग्रीन रंगाच्या सब्यसाचीच्या साडीत आलिया अतिशय मनमोहक दिसत होती. १९च्या दशकातील साडीच्या फॅशनचं वेस्टर्न सोबत करण्यात आलेलं फ्युजन चर्चेत राहीलं.

डव्ह कॅमेरॉन या अभिनेत्रीने घातलेला लॉन्ग स्लीव्ह गाऊन चर्चेत राहिला. फुलांची एम्ब्रॉयडरी असलेला या तिच्या गाऊनचे स्लिव्ह्ज चक्क जमिनीवर लोळत होते. हे स्लिव्ह्ज जमिनीतून उगवत आहेत असा भास होत होता.

अरियाना ग्रँडे हिने पांढऱ्या रंगाच्या  Loewe कोचरच्या गाऊन मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने डोळ्यांवर लावलेल्या विंग्जने सगळयांचं लक्ष वेधून घेतलं.

हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेझने Schiaparelli या ब्रॅण्डचा बेज रंगाच्या ट्रान्सपरंट गाऊन मध्ये हजेरी लावली. तिचा हा क्लासिक लूक सगळ्यांना पसंत पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.