मेट गालामधील सेलिब्रिटीजचे अतरंगी लुक्स

सकाळ डिजिटल टीम

Metropolitan Museum of Art (मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टस्) च्या वतीने दरवर्षी मेट गाला हा फॅशन कार्यक्रम आयोजित केला जातो. कधी बर्गर, कधी पिझ्झा तर कधी प्राण्यांचे कॉस्च्युम्स घालून सेलिब्रिटीज त्या त्या वर्षीच्या थीमप्रमाणे आऊटफिट घालून या सोहळ्याला हजेरी लावतात.

Celebrities outrageous look in met gala

फॅशन जगतातील सगळ्यात मोठा सोहळा असलेल्या या कार्यक्रमाला जगभरातील सेलिब्रिटीज हजेरी लावतात. सोशल मीडियावर यावेळी सेलिब्रिटीजनी केलेले लूकही चर्चेत असतात. पाहूया सेलिब्रिटीजचे असेच काही अतरंगी आणि वादग्रस्त लुक्स ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

"Rei Kawakubo/Comme des Garçons: Art of the In-Between"

अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार जॅरेड लिटोने २०२३च्या मेट गालाला मांजराचा पोशाख करत हजेरी लावली. त्याचा हा लूक बराच चर्चेत होता. पांढऱ्या रंगाच्या मांजराच्या कॉस्च्युममध्ये तो या कार्यक्रमाला उपस्थित होता.

Jared Leto

२०२३ या सोहळ्याची थीम जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लागरफेल्ड यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आली होती आणि म्हणून जॅरेडने कार्ल यांच्या प्रिय मांजराच्या लूकमध्ये हजेरी लावली.

Jared Leto

सतत चर्चेत असणारी अमेरिकन अभिनेत्री आणि बिझनेसवुमन हिने २०२१ मध्ये केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बॅलेन्सियागा हाऊट कोचोर या ब्रॅण्डचा काळ्या रंगाचा गाऊन तिने वेअर केला होता आणि त्याला मॅचिंग संपूर्ण चेहरा झाकणारा मास्क आणि काळ्या रंगाची ट्रेल तिने वेअर केली होती.

Kim Kardashian

किम कार्देशीयनच्या या लूकची चर्चा चांगलीच गाजली होती. अनेकांना तिच्या या लूकने धक्का बसला होता. अनेकांना ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्नही पडला होता.

Kim Kardashian

भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी २०१९ च्या मेट गालाला केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर तर प्रियांकाच्या या लूकने धुमाकूळ घातला होता. अनेकांनी तिच्या या फोटोवर मिम्स बनवले होते. अ

Priyanka Chopra Jonas

'नोट्स ऑन फॅशन’ ही थीम २०१९च्या मेट गालाची होती त्यासाठी प्रियांकाने  avant-garde silver Dior गाऊन घातला होता. अॅलीस इन वंडरलँडपासून प्रेरित होऊन तिने हा लूक केला होता आणि त्यासाठी तिने कित्येक करोड रुपये खर्च केले होते.

Priyanka Chopra Jonas

2019 मध्ये कार्डी बीने केलेल्या लूकनेही संपूर्ण फॅशन जगताच लक्ष वेधून घेतलं. तिचा हा लूक चांगलाच गाजला होता. ट्युल आणि सिल्क ऑर्गनझाचा वापर करून हा ड्रेस हाताने विणण्यात आला होता.

Cardi B

विशेष म्हणजे या ड्रेससाठी तीस हजाराहून जास्त कोंबड्याची पिसं रंगवून वापरण्यात आली होती. या ड्रेससाठी ३५ लोकांची टीम २००० तास काम करत होती.

Cardi B

अमेरिकन गायिका कॅटी पेरी कायमच मेट गालामधील तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जाते. २०१८ साली कॅटीने हेवनली बॉडीज या थीमवर आधारित लूकमध्ये हजेरी लावले. पांढरे पंख लावलेला सोनेरी ड्रेसमधील तिचा लूक चर्चेत होता.

Katy Perry

सोनेरी ड्रेस, त्याला मॅचिंग शूज आणि मोठे पंख या तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Katy Perry

पॉप स्टार रिहानानेही २०१७ मध्ये मेट गाला हजेरी लावली होती. यावेळी तिने केलेला लूक चांगलाच गाजला होता.

Rihanna

वेगवेगळ्या कपड्यांचे तुकडे जोडून आणि त्यांच्यापासून फुलांचे आकार बनवून तिचा हा ड्रेस तयार करण्यात आला होता.  "Rei Kawakubo/Comme des Garçons: Art of the In-Between" या थीमवर आधारित तिचा लूक होता.

Rihanna

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.