Vinod Dengale
सप्टेंबर हा महाराष्ट्र फिरण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. कारण पावसाळ्याचा शेवट, हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, धुक्याची चादर अन् दुर्मीळ फुलांचं सौंदर्य अनुभवता येतं.
September
eSakal
साताऱ्याजवळील कास पठार सप्टेंबरमध्ये विविध रंगांच्या दुर्मीळ रानफुलांनी बहरून जातं. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे फुलांचा स्वर्ग.
Kas Pathar
eSakal
माळशेज घाटातील धुक्याने झाकलेले डोंगर, खोल दऱ्या आणि रस्त्यालगत कोसळणारे धबधबे तुमचा प्रवास अविस्मरणीय करतील.
Malshej Ghat
eSakal
तलाव, हिरवाई आणि धबधबे तसेच शांत निसर्गाचा अनुभव यामुळे भंडारदरा सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Bhandardara
eSakal
ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवीगार दरी आणि धबधबे यामुळे मुंबई-पुण्याजवळचा परफेक्ट ब्रेक म्हणून लोणावळा-खंडाळा कायमच लोकप्रिय आहे.
Lonavala-Khandala
eSakal
गार वारा, हिरवाईने नटलेले डोंगर आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स यामुळे ढगांच्या कुशीत फिरण्याची मजा महाबळेश्वर आणि पाचगणीच मिळते.
mahabaleshwar
eSakal
Adventure Lovers साठी कोलाड म्हणजे स्वर्ग. कारण या महिन्यात कुंडलिका नदीतील व्हाईट-वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवण्याची संधी इथे मिळते.
kolad
eSakal
माथेरान हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. स्वच्छ हवा, हिरवाई आणि शांत वातावरणात काही वेळ शहराच्या गोंगाटापासून दूर घालवायचा असेल तर हा उत्तम पर्याय.
Matheran
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
I Go Home Just to Sleep”; Mumbaikar’s 6-Hour Daily Commute Will Break Your Heart
eSakal