रोहित कणसे
आपल्यापैकी बऱ्याच जणांना कार किंवा बाईक चालवणे आवडत असेल, पण रोडवर सततच्या ट्रॅफिक जामचा वैताग येत असेल.
पण गाडी चालवताना तुमच्या शहरातील रस्त्यांवर असलेले ट्राफिक सिग्नल हे तुम्हाला शत्रू वाटत असतील.
पण हे ट्राफिक सिग्नल गरजेचे आहेत यामुळे अपघात होण्याच्या शक्यता कमी होतात.
लोकांना रस्ता ओलांडता यावा यासाठी हे ट्राफिक सिग्नल महत्वाचे असतात, यामुळेच आपण आरामात घरी जाऊ शकतो.
पण तुम्हाला माहिती आहे का की जगात असा देखील एक देश आहे जेथे एकही ट्राफिक सिग्नल नाहीये.
एकही ट्राफिक सिग्नल नसलेला देश हा भारताचा शेजारी भूटान आहे.
एकही सिग्नल नसताना देखील भूटान येथे कधीच ट्राफिक जाम होत नाही.
डोंगराळ भाग असल्याने येथे गाडी चालवणे अगदी कठीण आहे. त्यामुळे भूटानमध्ये वाहने अगदी हळू चालतात त्यामुळे येथे ट्राफिक लाइट गरजेची नसते.
भूटानमध्ये ट्रॅफिक पोलीस जवान चौकात उभे असतात तेच येथील ट्राफिक कंट्रोल करतात.
नैराश्यातून उभारीसाठी अशी करा सुरूवात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.