सकाळ डिजिटल टीम
यंदाचा आयपीएल 2024चा सीजन चांगलाच चर्चेत आहे. काल म्हणजे 03 मे 2024 ला पार पडलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅचला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली.
अतिशय रंगलेल्या या मॅचमध्ये मात्र एका बॉलिवूड सेलिब्रिटीने तिच्या हजेरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
'क्रिकेट हेच आयुष्य आहे कि आयुष्य हे क्रिकेट आहे' असं जर्सीवर लिहिलेल्या या अभिनेत्रींचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या आगामी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी या मॅचला हजेरी लावली होती. तिने मॅचचाही पुरेपूर आनंद लुटला.
सोशल मीडियावर तिने कालच्या मॅचचे फोटोही शेअर केले आहेत. तिच्या जर्सीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जान्हवीच्या जर्सीवर माही असं लिहिलं असून 6 आकडाही लिहिलेला दिसून येतोय. तिच्या या टीशर्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जान्हवीने दिग्दर्शक शरण शर्मासोबत या मॅचला हजेरी लावली होती. या फोटोंना तिने "Mahi's Day Out... Mr. Mahi Miss you" असं कॅप्शन दिलं असून अभिनेता राजकुमार रावला सुद्धा या फोटोमध्ये टॅग केलं आहे.
सोबतच तिने सुरु असलेल्या मॅचची झलकही या फोटोमध्ये शेअर केली.
जान्हवी आणि राजकुमार रावचा लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून 31 मे ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. राजकुमार राव या सिनेमात महेंद्र ही भूमिका साकारतोय.
जान्हवीने या सिनेमासाठी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं असून सोशल मीडियावर तिचे क्रिकेट प्रॅक्टिस करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.