'या' दिग्गज अभिनेत्रीचा आतापर्यंत 4 वेळा मोडला संसार; 17 व्या वर्षीच बनली पहिल्यांदा 'नवरी'

सकाळ डिजिटल टीम

आजकाल बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा जास्त लग्न करणं हा ट्रेंड बनलाय. काहींची दोनदा तर काहींची तीनदा लग्नं होतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं 4 वेळा लग्न केलंय.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

90 चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जेबा बख्तियार. एकेकाळी आपल्या उत्तम अभिनयामुळं चर्चेत येणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

राज कपूर यांच्या सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेबाने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. सध्या ही अभिनेत्री पाकिस्तानमध्ये तिचं आयुष्य व्यतीत करत आहे.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

1991 साली प्रदर्शित झालेल्या 'हिना' या सिनेमात जेबी मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमात तिनं अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला होता.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

जेबीनं पहिलं लग्न पाकिस्तानमधील सलमान वल्लियानी यांच्यासोबत केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

त्यानंतर जेबीने अभिनेता जावेद जाफरी डेट केलं. काही वर्ष डेट केल्यानंतर तिनं जावेद जाफरीसोबत लग्न केलं. मात्र, तिचा हा संसारही टिकला नाही.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

दोन संसार मोडल्यानंतर जेबीनं अदनान सामीसोबत तिसरं लग्न केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, जेबी आणि अदनान यांना एक मुलगादेखील आहे. परंतु, अदनानसोबतही तिचं बिनसलं आणि ती वेगळी झाली.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

विशेष म्हणजे जेबीनं आता पाकिस्तानी व्यक्ती सोहेल याच्यासोबत लग्न केलं असून ती पाकिस्तानमध्ये स्थायिक आहे.

Bollywood Actress Zeba Bakhtiar

'हा' प्रसिद्ध IAS अधिकारी खजूर शेतीतून मिळवतोय लाखोंचं उत्पन्न; वर्षाला कमावतोय 18 लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.