बोनससाठी खरंच युद्ध झालं होतं का? सैनिक उतरले होते रस्त्यावर, सत्तेला लावलेला सुरुंग

सकाळ डिजिटल टीम

बोनस

अमेरिकेत १९३२ मध्ये पहिल्या महायुद्धातील माजी सैनिकांनी रखडलेल्या बोनसच्या पैशांसाठी राजधानीत आंदोलन केलं होतं.

Bonus War

|

Esakal

पैशांची मागणी

सरकारने १९२४ मध्ये सैनिकांना बोनस देण्याचं मान्य केलं होतं. पण हे पैसे तब्बल २१ वर्षांनी १९४५ मध्ये मिळणार होते.

Bonus War

|

Esakal

राजधानीत मोर्चा

दरम्यानच्या काळात महामंदीमुळे सैनिक बेरोजगार झाले. त्या सैनिकांनी पैसे लवकर मिळावेत म्हणून वॉशिंग्टनमध्ये मोर्चा काढला.

Bonus War

|

Esakal

तंबूंचं शहर

हजारो सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनाकोस्टिया नदीजवळ तंबू आणि झोपड्या उभारल्या होत्या.

Bonus War

|

Esakal

संघर्षाची ठिणगी

२८ जुलैला आंदोलकांना हटवताना पोलिस आणि सैनिकांमध्ये संघर्ष झाला; पोलिसांच्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.

Bonus War

|

Esakal

सैन्याची कारवाई

राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांच्या आदेशानंतर जनरल डग्लस मॅकआर्थर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सैन्य रस्त्यावर उतरलं.

Bonus War

|

Esakal

छावण्यांना आग

सैन्याने रणगाडे आणि अश्रुधुराचा वापर केला गेला. आंदोलकांच्या झोपड्या पेटवून त्यांना छावण्यांमधून हटवण्यात आलं.

Bonus War

|

Esakal

सरकारला फटका

हूव्हर सरकारवर टीका झाली आणि १९३२ च्या निवडणुकीत फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी त्यांचा पराभव केला. १९३६ मध्ये सैनिकांना बोनस मिळाला.

Bonus War

|

Esakal

जहाजांचा तळ नेहमी लाल रंगाचा का असतो?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ship Bottom Colour

|

ESakal

इथं क्लिक करा