Shubham Banubakode
शाहिस्तेखानावरील हल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील मुघलांच्या एका सुभेदाराला एक पत्र लिहिलं होतं.
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
या पत्रात त्यांनी मुघलांना चांगलंच सुनावलं होतं. पत्राची भाषा एवढी कडक होती, की त्या मुघल सुभेदाराच्या तोंडचे पाणीच पळालं. या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं? जाणून घ्या..
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
“आज तीन वर्षे झालं बादशाहचे मोठमोठे सल्लागार व योध्ये आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत.''
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
''आमच्या या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठिण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला करता?''
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
''याबाबत खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठविण्यास तुम्हास लाज कशी वाटत नाही''
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
''बिचारा अफझल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशहास का कळवत नाही?'' असा खरमरीत प्रश्नही महाराजांनी विचारला.
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
''शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे सारखा खपत होता. ‘शिवाजीचा पाडाव करून लौकरच त्याचा प्रदेश काबीज करितों’ असें बादशाहकडे लिहून लिहून थकला.''
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
''या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सुर्यास्तासारखा स्वच्छ सर्वांच्या समोर आहे. या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कुणीही असो; त्याची इच्छा फलद्रुप होणार नाही.''
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
''आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे. आणि तुम्ही कितीही बादशाहकडे खोट्या बातम्या लिहून पाठविल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीं चुकणार नाही'', असंही महाराजांंनी म्हटलं होतं.
Shivaji Maharaj Letter to Mughals After Shaista Khan Attack
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
esakal