CM शिंदेंचा बर्थडे अन् PM मोदींच्या स्पेशल शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. ९ फेब्रुवारी १९६४ हा शिंदेंचा जन्मदिन आहे.

शिंदे साठ वर्षांचे होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे गतिमान आणि कष्टाळू मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा असं म्हणत मोदींनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

''तळागाळातील संपर्क आणि मेहनती स्वभावामुळे त्यांच्या कामाचा ठसा उमटला आहे.राज्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कार्यरत आहेत.'' असं मोदी ट्वीटमध्ये म्हणतात.

एकनाथ शिंदेंच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना.. अशा सदिच्छा मोदींनी व्यक्त केल्या.

गतिमान आणि कष्टाळू असा विशेष उल्लेख मोदींनी केल्याने दोघांमधील संबंध पुन्हा अधोरेखित झालेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर कार्यक्रमांमधून मोदींना परदेशात किती मानसन्मान मिळतो, लोक आपल्याला त्यांच्याबद्दल कसे विचारतात, याबद्दल यापूर्वी भाष्य केलेलं आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये आपुलकीचे आणि प्रेमाचे संबंध असल्याचं मागच्या काही दिवसांपासून दिसून आलेलं आहे.

अजित पवार हे आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाईल, असं बोललं जात होतं. परंतु शिंदेंनी मोठ्या खुबिने ते स्वतःकडेच ठेवलं आहे.

बनावट जिरे कसे ओळखायचे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cumin seeds | esakal