धने आहेत अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे

Aishwarya Musale

धने

धने एक असा पॉवरफुल मसाला आहे, ज्याचे सेवन केल्यावर हार्मोनल असमतोल असणाऱ्या आजारांवर मात होऊ शकते.

थायरॉईड

केवळ भाजीतच नाहीत तर धणे अनेक आजारांवरही गुणकारी ठरतात. औषधीय गुणांनी युक्त असणारे धणे हे थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतात

प्रतिकारशक्ती

धन्याच्या पाण्याचे सेवन हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात आणि आजारांशी लढण्यास मदत करतात.

मधुमेह

धण्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण याच्या नियमित सेवनाने साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

धण्याचे पाणी

हे शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे ए,सी यासह अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते. सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिणे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करते

पोटाशी संबंधित समस्या

धण्याचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. कारण धण्याचे पाणी पचनाची समस्या देखील दूर करते.

त्वचा

धण्याचे पाणी पिणे त्वचेसाठी खूप गुणकारी मानले जाते. कारण कोथिंबीरमध्ये भरपूर लोह असते. त्यात अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन केल्याने चेहरा चमकदार होतो. ते तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा