Aishwarya Musale
तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचं असेल, तर योग्य जीवनशैली तसेच आहाराचं पालन करणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
अलीकडेच एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता श्रेयस तळपदेलाही हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर त्वरित अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधीही सुष्मिता सेन तसेच इतर कलाकार हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडले आहेत.
हृदयविकाराचा धोका केवळ वृद्ध लोकांमध्येच नाही तर तरुणांमध्येही वाढतोय. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल, तर योग्य जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
धूम्रपानाचा आपल्या हृदयावर वाईट परिणाम होतो. बिडी, सिगारेट आणि इतर धूम्रपानाच्या पदार्थांच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो.
जे लोक दिवसातून अनेक वेळा धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत व्यक्तीने ताबडतोब धुम्रपानापासून दूर राहावे.
जास्त साखर आणि जंक फूड देखील हृदयासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. याबरोबरच या आजारांची तपासणीही वेळोवेळी करावी.
आजच्या काळात बहुतांश लोक तणावाचा सामना करत आहेत. हळूहळू त्याचे रूपांतर चिंता आणि नैराश्यात होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. यासाठी जास्त ताण न घेता तणावावर नियंत्रण ठेवणं गरेजचं आहे.
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, शक्य तितके शारीरिकरित्या सक्रिय व्हा. वेळेवर झोपणे आणि उठणे आणि सकस आहार घेणे खूप महत्वाचे आहे. तसेच, दररोज किमान 7-8 तास पुरेशी झोप घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.