१२ दिवसांचा क्रिकेट सामना, तरही निकाल ड्रॉ!

Pranali Kodre

क्रिकेट

क्रिकेट हा खेळ आता खूप वेगवान झालाय, अनेकांना तर ५ दिवसांचा कसोटी सामनाही कंटाळवाणा वाटतो.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

सर्वाधिक दिवस चाललेला सामना

पण तुम्हाला माहितीये का, इतिहासात असाही एक सामना झालाय जो तब्बल १२ दिवस चालला, अन् तरीही त्याचा निकाल लागलाच नाही.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

Timeless Test

हा सामना 'टाईमलेस टेस्ट' म्हणून ओळखला जातो, जो ३ ते १४ मार्च १९३९ दरम्यान डरबन येथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला. नियम एकच होता—जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत खेळत राहायचं.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

12 Days

या १२ दिवसांत ९ दिवस प्रत्यक्ष खेळ झाला, २ दिवस विश्रांतीचे होते आणि १ दिवस पावसामुळे वाया गेलेला.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

४३ तास...

एकूण ४३ तास १६ मिनिटांच्या खेळात ५,४४७ चेंडू फेकले गेले आणि तब्बल १,९८१ धावा झाल्या होत्या.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

४२ धावांचीच गरज अन्...

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला जिंकण्यासाठी ६९६ धावांचे टार्गेट दिलेलं. १२ व्या दिवशी इंग्लंडला ४२ धावांचीच गरज असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यादिवशी खेळ होणं शक्यच नव्हतं.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

पावसापेक्षा मोठी अडचण...

पावसापेक्षा मोठी अडचण ही होती की, इंग्लंड संघाला केपटाऊनहून मायदेशी परतणारी जहाज पकडायची होती. त्यासाठी त्यांना १४ मार्चला डर्बन सोडावंच लागणार होतं.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

'बस्स, पुरे झालं'

दक्षिण आफ्रिकेने प्रवासाची दुसरी सोय करा असं म्हटलं, पण इंग्लंडचा कर्णधार वॅली हॅमंड म्हणाला—बस, आता पुरे झालं. अखेर अंपायर्सच्या संमतीने सामना 'ड्रॉ' घोषित करण्यात आला.

Cricket’s Longest Test Match

|

Sakal

हेमंड यांचं विधान

हॅमंड यांनी त्यांच्या फेअरवेलच्या भाषणात म्हटलं होतं की टाइमलेस टेस्ट सामने खेळासाठी योग्य नाहीत आणि असा शेवटचा टाइमलेस टेस्ट सामना खेळला गेला असावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे.

Cricket’s Longest Test Match

|

Sakal

नंतर पुन्हा असा सामना नाही...

अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. नंतर कधीही असा सामना झाला नाही.

Cricket’s Longest Test Match Ever

|

Sakal

इंग्लंडकडून खेळलेला भारतीय राजपुत्र: दुलीपसिंह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DuleepSinghji

|

Sakal

येथे क्लिक करा